STORYMIRROR

Prashant Kadam

Inspirational Others

3  

Prashant Kadam

Inspirational Others

अंधश्रध्दा !!

अंधश्रध्दा !!

1 min
572

बुवाबाजी, भोंदूगिरी, 

जादूटोणा, काळी जादू

आहेत सर्व अशाश्वत गोष्टी

ज्यांची ना हमी ना शाश्वती

त्यात अडकल्यास होणार 

हमखास फसगती


अशाश्वत गोष्टींवर विश्वास 

म्हणजे फक्त अंधश्रद्धा

निव्वळ आंधळा विश्वास

समाजाला लागलेली कीडच

लोकांच्या असहायतेचा 

नाहक घेतलेला गैरफायदा


म्हणूनच करूया अंधश्रद्धेचे निर्मूलन

हवे अघोरी रुढी, प्रथांचे उच्चाटन

श्रद्धा जरूर ठेवूया पण शाश्वत गोष्टींवर

तर्क आणि विज्ञानाने तपासणी करून

चला होऊ सर्व जागरूक अन् संघटीत

अन् करुया अंधश्रद्धेचे समूळ निर्मूलन 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational