STORYMIRROR

Anuradha Kalyani

Inspirational

3  

Anuradha Kalyani

Inspirational

माझी कविता...

माझी कविता...

1 min
640

कल्पनेचा कुंचला घेऊन,

लिहावं वाटतं काहीतरी,

मनाचा सल, मनाचा कढ,

ऊतरावा वाटतो कागदावर,

आणि क्षणातच माझ्या कवितेला पान्हा फुटतो,

आणि स्त्रवत जाते ती कागदावर,

शब्दांनी काठोकाठ भरलेली माझी कविता,

पाझरत राहाते शब्द आणि शब्द,

अगदी भावनांचा निचरा होईपर्यंत,

आणि पुन्हा एकदा नव्याने

बांधून घेते स्वतःला शब्दांच्या विळख्यात,

टच्च गर्भारशी होते,

शब्दांच्या ओझ्यांनी,

वाट बघत राहाते,

फुटणा-या पान्ह्याची,

पुन्हा पुन्हा पाझरण्यासाठी..।.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational