STORYMIRROR

Anuradha Kalyani

Others

4  

Anuradha Kalyani

Others

आयुष्याची वही...

आयुष्याची वही...

1 min
520

आयुष्याची वही ज्याची त्याची,

नियतीनं कोरीच पाठवलेली,

प्रत्येकाची वेगळी,

पण सटवीनं लिहिलेलं खरं करताना,

कधी रंगीबरंगी तर कधी नुसतीच रंगहीन होणारी,

कधी पूर्ण पानं भरणारी,

तर कधी कोरीच राहाणारी,

आयुष्याची वही,

नियतीचा लेखा-जोखा,

कधीच न समजणारी,

सटवीचं छद्मी हास्य अंतरंगात सामावणारी,

आयुष्याची वही,

कधी सुखात भिजणारी,

कधी दुःखात थिजणारी,

आयुष्याची वही कधी पूर्ण तर कधी कोरीच राहाणारी....



Rate this content
Log in