STORYMIRROR

Swati Devale

Inspirational

3  

Swati Devale

Inspirational

माझ्या प्रिय मुलांनो

माझ्या प्रिय मुलांनो

1 min
441

माझ्या प्रिय मुलांनो ,

किती वाटांनी समृद्ध होता येतं ,

मी काय सांगू तुम्हाला


एक वाट जाते पुस्तकांच्या जगात

अनुभवांची, व्यक्तित्वाची, विचारांची

अन् लखलखत्या संस्कारांची

भव्य दालनं सताड उघडी करते.


एक वाट जाते कुंपणापलिकडच्या गर्द शेतात

मातीशी घट्ट नाते जुळवणा-या मुळांची ,

आभाळाशी गप्पा मारणा-या फांद्यांची

अन् घामाने चिंब झालेल्या मायेची

कष्टाळू कहाणी ती अलगद उघडी करते .


एक वाट जाते खेळाच्या मैदानात

सुदृढ भारताचे स्वप्न साकारण्याची

बलशाली पिढिचे महत्व सांगण्याची

अन् कणखर मने तयार करण्याची

युवाशक्तीची गरज ती उघडी करते


एक वाट जाते चौकटीबाहेरच्या विश्वात

हे असे का ? तसे का ? प्रश्नांची उत्तरे शोधण्याची

अविरत धडपडीचे मोल जाणण्याची

अन् सतेज बुद्धी तयार करण्याची

संशोधनाची कवाडे ती उघडी करते


एक वाट जाते कलेच्या क्षेत्रात

रंगांशी नातं जुळवण्याची, स्वरतालांशी मैत्री करण्याची

अन् बेभान होऊन नृत्य करण्याची

निखळ तल्लिनता ती उघडी करते


एक वाट मात्र जाते या शब्दांच्या पलीकडे

क्रोधापेक्षा मायेची, अहंकारापेक्षा समजुतीची ,

द्वेषापेक्षा सकारात्मक ऊर्जेची ऊर्मीची

अन् दिखाव्यापेक्षा ख-या जाणीवेची

सुगंधित मने ती उघडी करते


एका वाटेतून असंख्य वाटा शोधता येतात

वाट चालणं महत्वाचं

यश-अपयश येणारच , येऊ देत

अनुभव घेत राहणं जिवंतपणाचं 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational