STORYMIRROR

Dilip Yashwant Jane

Inspirational

3  

Dilip Yashwant Jane

Inspirational

विजय

विजय

1 min
329


उदास रात्रीच्या अंधारात

जळत होती ज्योती

त्या जीर्ण मंदिराच्या गाभाऱ्यात

उरली होती एकटी

तेव्हाच आला कोठूनतरी

अवखळ वारा पायऱ्यांवरती

चाहूल लागता खट्याळाची

पालवी थोडी सळसळली

आवाजानं होऊन भयभीत

ज्योती बावरली जराशी

फडफडवत आपली ज्योत

घाबरून अवखळ वाऱ्याला

साद घातली मनापासून

तिने गाभाऱ्यातल्या देवाला

त्या भयंकर एकांतातही

देव होता मदतीला

मग ती... भीते का कुणाला ?

वारा वाहून गेल्यावर

थांबली पानांची सळसळ

आणि परत एकदा

इवल्याशा ज्योतीनं मात्र

मिळवला काळोखावर विजय


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational