जाणता राजा
जाणता राजा
जिजाऊ पुत्र शिवबा आज जन्मला
शिवनेरी गडावर सूर्य तळपला
बाळकडू जिजाऊनी बालपणी पाजुनी
महाभारत, रामायणातल्या गोष्टी सांगुनी
शिव छत्रपती हो घडवला जी..जी.।। १ ।।
स्वराज्य स्थापनेचा केला पक्का निर्धार
घेतले शोधून मावळातून वीर सरदार
तळपल्या तयांच्या तेजस्वी तलवारी
अन् शत्रुंवर केला हो वार त्यांनी भारी
हो जी ..जी ..जी ..।।२ ।।
शिवबांच्या हुशारीनं अन् दूरदृष्टिने
रचिले गनिमी कावे मावळ्या संगतीने
केला दुश्मनांचा संपूर्ण नायनाट
पळता केली तयां भुईसपाट
हो. जी. ..जी ..जी.....।।३ ।।
झाला हो जाणता राजा रयतेचा
सर्वधर्मभाव एकात्मतेचा
मान सन्मान ठेवला स्त्रियांचा
विचार केला जनकल्याणाचा
असा शिवबा राजा हो.. हो.।। ४ ।।
