STORYMIRROR

Savita Jadhav

Classics Inspirational

3  

Savita Jadhav

Classics Inspirational

कोजागिरी

कोजागिरी

1 min
431

आश्विन मासात पौर्णिमेच्या मध्यरात्री

कोजागिरी पौर्णिमा होते साजरी,

दूध आटवून चांदण्यांच्या प्रकाशात

लुटती दूध पिण्याचा आनंद सारी


कोजागिरी जाणली जाते

नवान्न किंवा शरद पौर्णिमा,

शीतल आणि आल्हाददायक

भासतो जणू नभातला चंद्रमा


लक्ष्मी आणि इंद्रदेव पूजनीय या समयी

लक्ष्मी आल्हाददायक इंद्र शीतलता दायक,

करूया पूजन मनोभावे त्यांचे

अन् पाहूया चंद्रमाचे रूप ते मनमोहक


कोजागिरीच्या मध्यरात्री माता लक्ष्मी 

भूतलावर अवतरीत होई,

कोण असे जागा कटाक्षाने पाही,

तयावर संतुष्ट होऊन कॄपाशिर्वाद देई


चला चांदण्यांच्या सोहळ्यात

सामील होऊ मजा लूटूया सारे,

कोजागिरी करू साजरी संगतीने

जपूया आपुलकीचे बंध उडवू आनंदाचे फवारे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics