STORYMIRROR

Pandit Warade

Tragedy Fantasy

3  

Pandit Warade

Tragedy Fantasy

कल्पनेची भरारी

कल्पनेची भरारी

1 min
466


मनाचे तोडुनी बंधन नरा घे झेप आकाशी

तिथे जाऊन भेटावे नभीच्या चंद्र ताऱ्यांशी


कसे ते राहती तेथे सुखाचा क्षण कसा मिळतो

कधीही स्पर्श दुःखाचा मनाला दंश ना करतो


मनाला हाव त्यांच्याही कशी नसते कधी काळी

मनुष्यालाच का साऱ्या जगाची हाव सुटलेली


तरू वेली किती सुकल्या नसे छाया जराशीही

जलावाचून त्यांचेही मरण आले गळ्यापाशी


ढगांशी सूत जुळवावे तयांशी गूज सांगावे

तया विनवून सांगावे, 'जरा पाऊस पाडावे'


मनाच्या कल्पनेने तू जरा देवाजवळ जावे

बसावे पायरीशी अन सुखाचे सूत्र मागावे



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy