कळले कुणाला
कळले कुणाला
जीवनाचे सार नाही आजवर कळले कुणाला
भोगता राशी सुखाच्या दुःख ना टळले कुणाला
मोगरा केसात माळुन प्रेयसी दारात आली
क्षण सुखाचे एवढे नशिबात फळफळले कुणाला
आज खातो जो तुपाशी लोळतो मस्तीत येथे
पण उद्याच्या प्राक्तनाचे डाव आकळले कुणाला
जीवघेणा काळ आला आपलेही दूर झाले
पाडले उघडे जगाला, मारले, छळले कुणाला
प्रेतसंख्या वाढली अन् जाहली गर्दी स्मशानी
अर्पिण्या श्रद्धांजलीही शब्द हळहळले कुणाला
