STORYMIRROR

Aniket Kirtiwar

Romance

3  

Aniket Kirtiwar

Romance

किती दिवसांनी भेटलीस तू

किती दिवसांनी भेटलीस तू

1 min
7.7K


किती दिवसांनी भेटलीस तू

यौवनाने फुललीस तू

किती दिवसांनी भेटलास तू

कुण्या दुःखाने झडलास तू


मी सुखाच्या छायेत होते

तरी डोळ्यात होतास तू

मी दुःखाच्या गर्तेत होतो

तरी आठवणीत होतीस तू


ते दिवस होते किती गुलाबी

स्वप्ने रंगवली रंगीबेरंगी

ग्रीष्माच्या उन्हात ही

थकलो नाही आम्ही जराभी


एक झुळूक आली कुठून

अन् भुर्रकन उडालीस तू


मी वचन देते तुजला गडे

नाही घडणार हा गुन्हा पुढे

एकमेकांच्या छायेत राहू

नाही पडणार अश्रूंचे सडे


घालेन फुंकर प्रेमाची मी

ज्या व्रणांनी रडलास तू


मी सुखाच्या छायेत होते

तरी डोळ्यात होतास तू

किती दिवसांनी भेटलीस तू..........


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance