STORYMIRROR

Mangesh Phulari

Fantasy

2  

Mangesh Phulari

Fantasy

किती बंधनात रहावं

किती बंधनात रहावं

1 min
13.7K


किती बंधनात रहावं

कधी तरी मुक्त जगावं

शहाण्यासारखं तर सगळेच वागतात

कधीतरी आपल्यातलं

वेडेपण आजमून पाहावं.

मोठे तर रोज़च होत असतो आपण

कधी लहान पण बनून वागावं

आपल्यात लपलेल्या अल्लडपणाला

बाहेर काढून खेळावं.

सोईस्कर जगण्यासाठी

सारखं जमवत असतो आपण

कधीतरी आवडणार्‍या गोष्टींवर

खर्च करून बघावं.

किती बंधनात जगावं 

इतकं सुंदर आयुष्य मिळालंय

याला हसत खेळत मनसोक्तपणे

आनंद घेत जगावं.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy