किनारा
किनारा
दरी खोर्यातून आली धावत
सुसाट सुटली धारा
अंतरीची ओढ माझ्या
समजेल का रे किनारा ........
माझ्या मनीच्या दु:ख वेदना
घे सामावून पसारा
अंतरीची ओढ माझ्या
समजेल का रे किनारा......
किती दिसांनी भरला ऊर
बेभान सुटला वारा
अंतरीची ओढ माझ्या
समजेल का रे किनारा ......
