खूप जड हाेतं....
खूप जड हाेतं....
खूप जड हाेतं
तुम्हांला निराेप द्यायला,
सेवानिवृत्त झाले तुम्ही
जड जातंय आम्हाला पचवायला...
खूप जड हाेतं
कसं तुमचं निरपेक्ष शिकवणं,
प्रत्येक विद्यार्थ्यांला कसं
प्रेमळपणे वागवणं....
खूप जड हाेतं
तुमचा सहवास नाही लाभणार,
तुम्ही दिलेले गुरू संस्कार
नाही कधी विसरणार....
खूप जड हाेतं
आठवते तुमची प्रेमळ शिक्षा,
जीवनाच्या प्रत्येक वेळी
आठवत राहील तुमची परीक्षा...