STORYMIRROR

Prashant Shinde

Action Classics

3  

Prashant Shinde

Action Classics

खुंटी...!

खुंटी...!

1 min
172

खुंटी अंगणातली

खुंटी सोप्यातली

खुंटी माजघरातली

खुंटी स्वयंपाक घरातली

खुंटी न्हाणी घरातली

खुंटी गोठ्यातली

खुंटी कोठी खोलीतली

खुंटी सौचालयातली

खुंटी पडवीतली

खुंट्या अनेक प्रकारच्या

आणि अनेक ठिकाणच्या

पण फरक इतकाच

प्रत्येक खुंटीच कार्य वेगळं

महत्व वेगळं,काम वेगळं

तुम्ही म्हणाल ते कसं...!

पूर्वी

अंगणातली खुंटी ईरलं पोत टांगायला

सोप्यातली खुंटी कोट टोपीला

मजघरातली खुंटी लुगडं कांबळ्याला

स्वयंपाक घरातली किटली शिंकाळ्याला

न्हाणीतली टॉवेल चड्डीला

गोठ्यातली चाबूक मुसकीला

कोठी खोलीतली रिकाम्या पिशव्यांना

सौचयल्यातली कंदिलाला

पडवीतली गॅस बत्तीला

साऱ्या खुंट्या आपलं स्थान टिकवून

आपलं काम चोख बजावत होत्या

आपली नाती जीवनाशी जोडत होत्या

आज मात्र नाती लोपली नाळ तुटली

खुंटी भिंतीतच चीरडली गेली

बाबा प्रगतीने काँक्रीटच जंगल वाढळ

माझ्या खुंटीचे राज्य लोप पावलं

पण

अजूनही खुंटी मनामनात जिवंत आहे

आपलं स्थान हृदयात टिकवून आहे....!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Action