STORYMIRROR

Nurjahan Shaikh

Inspirational Others

3  

Nurjahan Shaikh

Inspirational Others

खुणावे चांद पुनवेचा

खुणावे चांद पुनवेचा

1 min
418

शीतल चांदणे चंद्राचे 

मनाला हुरळून नेई,

मंद सुगंध रातीत 

मन हर्षुन जाई.


खूणावे चांद पुनवेचा 

खुल्या मोकळ्या आभाळी, 

बावरे हे मन वेडे 

स्वप्न पाही अवकाळी. 


गोल गरगरीत चांदणे 

डाग ही खुलून दिसे, 

काळ्या ढगाआडून 

चंद्र मोहक भासे.


आठवे मज आज 

प्रीतीची ती रात, 

पुनवेचा तो चांद 

मधुर संगीत गात. 


सुंदर त्या क्षणात 

नाते उजळून गेले, 

लाजता मन हे माझे 

चंद्रही लपून बसले.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational