Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

गोविंद ठोंबरे

Romance

2  

गोविंद ठोंबरे

Romance

खरंय माझं

खरंय माझं

1 min
7.0K


मी पहात नाही तुला...

ना चोरून, ना म्होरून,

ना हासून,ना लाजून ।


मी शोधत नाही तुला...

ना नजरेच्या आडून,ना गर्दीला सारून,

ना रस्त्यात थांबून,ना बाजूला होऊन ।


मी म्हणत नाही तुला...

ना घाबरून,ना धडसावून,

ना दचकून,ना फरमावून ।


मी बोलवत नाही तुला...

ना स्वप्नातून,ना खऱ्यातून,

ना सांगाव्यातून,ना बुलाव्यातून ।


मी लपवतही नाही तुला...

ना मनातून,ना जिवातून,

ना हृदयातून,ना स्पंदनातून ।


मी फक्त दाखवत नाही तुला...

ना शब्दातून,ना भावनेतून,

ना ओठातून, ना डोळ्यातून ।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance