STORYMIRROR

Anju Metkar

Tragedy

3  

Anju Metkar

Tragedy

खंत

खंत

1 min
225

नाजूक मी सावळी

रंग माझा का गव्हाळी

नसे मज चैतन्य नव्हाळी

मनी आक्रंदते ही बकुळी।।१।।


अवनीच्या या विशाल उदरात

सुंंदरतेची नसे ददात

मीच का उदास रूपरंगात

हिरमुसते,मुसमुसते बकुळी एकांतात।।२।।


शुभ्रतेच्या या झगमगाटी

मोगरा,सोनटक्का, जाई,श्वेतकोरांंटी

सायली ,जुई,कुुंदा ही नटती

कोमेजलेपण माथी नयनी अश्रूूदाटी ।।३।।


गुलाबाची तर अनोखी मिजास

फुलांचा म्हणे तो राजा खास

मोहक पंंखुुुडीत सुगंधी श्वास

सौंदर्यापुुढे त्याच्या वाटते मी भकास ।।४।।


सोनसळी रंगात चंपक तोरा

तळ्यात रंगबिरंगी कमलिनींचा डेरा

हासर्या ताटव्यात शेवंतीचा फुलोरा

माझ्याच नशिबी का कुरूपतेचा नजारा ।।५।।


अल्पायुषी प्राजक्त

बरसला अवनीवर

गुज कथनास अधीर

उभा बकुुुळीसमोर ।।६।।


सत्यभामेच्या मर्जीखातर

मी म्हणे अवतरलो भुईवर

बहरलो सत्यभामेच्या द्वारात

पडती फुुुले रूक्मीणी अंगणात ।।७।।


रुक्मिणीवर मोहनाला

राधेची पडली भ्रांत

 प्रियेच्या निस्सीम प्रेेेमाला

उतराई होण्याची मनी खंत ।।८।।


दिसताच बकुुळ फुले फुुुललेेेली

मोहक सुुुगंधाने दरवळलेेली

धरिता अंजलीत ती तनमनी मोहरली

हरिस्पर्शात ती श्यामलवर्णात नहाली ।।९।।


सावळबाधा बकुळीची

तशीच बाधा व्याकूूळ राधेची

भेटीस्तव हरीच्या वेडीपिशी

 श्यामलवर्णी रंगुन जाई अहर्निशी ।।१०।।


राधेश्यामाच्या प्रीतीचे

गुज जाणुनी अंंतरिचे

श्यामलवर्णी रंगण्याचे

दुःख सरले बकुुळीचे ।।११।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy