खेळच आहे,गुंतवणुकीची पावती
खेळच आहे,गुंतवणुकीची पावती
हार जीतचा फैसला,
असतो,तुमच्या खेळावर!
तुमच्या,गुणांचा,कर्तृत्वाचा,
ठसा, उमटतो खेळावर !!1
प्रतिकुल, परिस्थितीतून,
उभारी घेत,उभारली करीअर!
किती पापड, लाटले त्यासाठी,
किती तरी,वर्षे सहन केली मरमर!!2
अपमानांचे घुट पित,
अपयशाला,सामोरे गेले!
जिद्द मनांने धरत त्वेषाने,
क्षुद्र ,राजकारण अव्हेरले!!
पराजय होता,नारळ मिळतो,
मिरवती,सारेच डोक्यावरी जेत्याला!
लोकांची, आकलनबुध्दी अल्प असते,
विसरून, जाती,हरलेल्याला!!4
परिश्रम,कष्ट मेहनतीला,
काहीच, पर्याय नसतो !
गुणवत्ता, जरी ठासून भरली,
सरावाशिवाय,विजय मिळत नसतो!!5
खेळणाऱ्या, मुलाला बेकार,
समजतात, इथले पालक !
आपला मुलगा,डाँक्टर,इंजिनीयर बनावा,
काळ बदलला,तरी विचारात नाही फरक !!6
किती तरी,डाँक्टर इंजीनियर,
बेकार हिंडती,हाती पदव्यांची भेंडोळी !
पोट भरविण्या पुरता,रोजगार नाही,
खायचे वांदे होता,फिरती रानोमाळी !!7
जेत्याच्या पायाशी,नोकरी छोकरी,
वैभव लक्ष्मी,सुख समृद्धी,लोळण घेती!
उत्पन्न,स्थैर्य,सुरक्षितेची हमी तयाला,
खेळच आहे, गुंतवणुक ठेवीची पावती! 8
