STORYMIRROR

Shobha Sanjay Bavdhankar

Tragedy Others

4  

Shobha Sanjay Bavdhankar

Tragedy Others

॥ खेळ ॥

॥ खेळ ॥

1 min
442

बालविर पुर्वी घरात खेळायचे  

भिकार सावकार, झब्बु पत्त्याचे खेळ  

आजी आजोबांचा जायचा छान वेळ  


आई बाबांबरोबर कॅरम, बुध्दिबळ  

झोप आली कि बाबा म्हणायचे आजी गोष्ट सांगते जा पळ  


मैत्रिणींबरोबर सारीपाट, सागरगोटे  

चिमुकल्यांनी फुलुन जायचे अंगण ओटे  


आता मुले रमतात मोबाइल मधला गेम  

कोणतेही कारण, आत्महत्या करतिल नाही नेम  


मोठे टॉवर, छोटी घरं

नाही दारात तुळस  

मैदानी खेळ खेळायला खुप करतात आळस  


मैदानात गट करुन खेळायचे

मारामार्‍या असायच्या

सोडवता यायचे नाकी नऊ 


कंप्युटर एकटे एकटे खेळतात, 

कोंडुन घेतात बहिणभाऊ  


बाल तरुणांना एक सांगणे 

जा पळा, करा मस्त खोड्या  

आळीपाळीने मारा दोरीवरच्या उड्या  


आपोआप वाढेल उंची, वजनाचा भार  

टवटवीत मन होईल खेळण्याने फार  


खेळा मोकळ्या हवेत

उदंड आयुष्य, छान आरोग्य

मिळेल स्वत:च्याच कवेत ॥


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy