खेळ शब्दांचा मांडला
खेळ शब्दांचा मांडला
खेळ शब्दांचा मांडला
व्यक्त करण्यास भाव,
बोले संवाद मनाचे
मानवाचा घेई ठाव. ..१..
गोंजारता शब्दातून
मन आनंदी असते,
निराशेच्या काळोखात
शब्द मार्ग दाखवते. ..२..
पडे भुरळ शब्दांची
'गीता' त्यातून रचली,
इवल्याशा जीवनाच्या
खोल मनात रुजली. ..३..
शब्द कधी मनी लागे
कधी मनास उभारे,
संकटात धीर देई
यश प्राप्तीस उद्धारे. ..४..
थाप शब्दांची पडता
बळ हातात संचारे,
दुःखी कष्टी मनासही
धीर देऊन सहारे. ..५..
खेळ शब्दांचा निराळा
आयुष्यात भिनवले,
रंग छटा शब्दातले
जीवनात रंगवले . ..६..
