कहाणी
कहाणी
पाऊले पडतात अडखळत
आयुष्य वाटते अनवाणी
तू नसल्यावर भासते मज
आपली अधुरी कहाणी .
आठवणीत रमावे तुझ्या
हसावे वेडावून क्षणभर
तू नसल्यावर या मंदिरात
आनंद नसतो कणभर
तुझा हवाहवासा सहवास
नवी उर्जा देतो मनाला
तू नसल्यावर होत राहतात
यातना सार्या तनाला
अंगवळणी तुझीच सवय
तूझाच मनाला ध्यास
तू नसल्यावर सोबत
ना उतरे घशाखाली घास