केव्हा तरी पहाटे
केव्हा तरी पहाटे
सहजची जाग आली
मज पहाटे केव्हातरी
मंदावले नव्हते तारे
निशेचेच राज्य धरेवरी
कानी आली किलबिल
प्रश्न आला मनातूनी
कोण बरे उठविते खगांना
उठा आता घरट्यातूनी
मंदावले बिंब शशीचे
तारिका पण मंदावल्या
अलवार एक एक करूनी
नभात लुप्त जाहल्या
शीळ घालीत कानाशी
थंड झुळुक वा-याची
गेली सांगून मजला
वेळ झाली उठण्याची
