STORYMIRROR

Chandan Pawar

Action

2  

Chandan Pawar

Action

"कॅशलेस" इंडीया

"कॅशलेस" इंडीया

1 min
307

नोटबंदीच्या एकहूकमी निर्णयाची

सर्वत्र होतेय चर्चा सॉलिड ;

पूर्वतयारीविना " कॅशलेस " इंडियाचा

घेतलेला निर्णय " व्हॅलीड ".


नोटाबंदीमुळे गोरगरिबांच्या

तोंडाला फेस आलाय ;

रिकाम्या खिशाचा उधारीचा

व्यवहार " कॅशलेस " झालाय.


पांढरा पळून पळून थकलाय

पण काळा मात्र जपून आहे ;

पांढरा झाला बँक जमा

काळा अजून लपून आहे .


काळ्याला तारक असे शासनाचे

" अभय " योजना धोरण ;

काळ्याला वाचवतांना पुन्हा

पांढऱ्याचेच आहे मरण .


नोटाबंदीमुळे काळ्या- पांढऱ्याची

जुळलीत अतूट अशी नाती ;

कॅशलेसने बँक अधिकारी-

कर्मचाऱ्यांच्या नोकरीची माती .


कॅशलेसच्या मदतीसाठी शासनाचे

नवीन " भीम " अँप आलेय ;

आपलाच अंगठा पासवर्ड

ठरवून शासकीय मॅप झालेय .


रांगेत उभे राहून निशुल्क

बँक व्यवहार फक्त " थ्री "

सर्वसामान्यांना बँकेत जाणे- येणे

तेवढेच आता " फ्री "


"आपल्याच पैशासाठी रांगा "

हीच नोटाबंदीची कथा ;

लोकांनी लोकांसाठी निर्मिलेल्या

लोकशाहीची ही गाथा .


Rate this content
Log in

Similar marathi poem from Action