STORYMIRROR

Ganesh G Shivlad

Fantasy

4  

Ganesh G Shivlad

Fantasy

कधीतरी असे घडावे..

कधीतरी असे घडावे..

1 min
225


वाटते कधीतरी जगी नवल असे घडावे..!

आकाशातील चांदणे या पृथ्वीवर सांडावे..!


चंद्राने त्याचे घरकुल जमिनीवर आणावे..!

असे सुंदर स्वप्न या धरणी मातेला पडावे..!


चंद्राची शितलता भुलोकी मानवा लाभावी..!

चांदण्याची चकाकी प्रत्येकाचे अंगी भिनावी..!


अशी चांद्रलोकी किमया इहलोकी साधावी..!

जेणे ही दुनिया सारी सुखी समाधानी व्हावी..!



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Fantasy