कधी मातीने तर कधी..
कधी मातीने तर कधी..
कधी मातीने तर कधी नशिबाने मळला होता
घरी नव्हता तेव्हा माझा बाप मला कळला होता,
आकांक्षांच्या पावसाळ्यांत कितीदा तो पोळला होता
दुष्काळाच्या उन्हामध्ये पिकासोबत जळला होता,
पायामधला काटा त्याच्या रक्तामध्ये रुळला होता
पाण्याविना अश्रू त्याच्या पापणीतून ढळला होता,
बांधावरच्या झाडाच्याही सावलीला तो सळला होता
हातामध्ये चऱ्हाट घेऊन बाप माझा वळला होता,
कधी मातीने तर कधी नशिबाने मळला होता
घरी नव्हता तेव्हा माझा बाप मला कळला होता...
