कचरेवाला ते सफाई कामगार
कचरेवाला ते सफाई कामगार
हल्लीच भेट झाली एका मुलाशी
कचरा उचलण्याचं काम करतो जाऊन तो घरोघरी
अर्धवट शिक्षण सोडून आपल्या पोटासाठी
सांगत होता तो कचरा आम्ही उचलतो
पण लोकांची नजर असते आम्हीच कचरा असलेल्यासारखी
कधी लोक आमच्याशी हसत नाही
ना कधी बोलत नाही
जणू आम्ही केलंय मोठं पाप असंच वाटतं
कसल्या कसल्या कचऱ्याच्या पिशव्या उचलाव्या लागतात
वर त्याचा दुर्गंधही सोबत असतो
आम्हीही माणूस आहोत ना
हे बहुतेक थोडे विसरतात
कचरेवाला हे नाव आम्हाला पडलंय
हल्ली मात्र बरं वाटतंय जेव्हा
सफाई कामगार म्हटलं जातंय