काय सांगावे...!
काय सांगावे...!
काय सांगावे काय सांगू नये
हे न सुटणार कोड आहे
आपलं कोण परक कोण
हे जाणण कठीण आहे
आई आपली, बाप आपला
काळा पुरतं ठीक आहे
पत्नी आपली मुलं आपली
स्वार्थापुरत मूक आहे
वाल्ल्याचा वाल्मीकी हे काही
ऐकलेले, वाचलेले खोटे नाही
प्रत्यन्तर आपल्याला ते काही
जीवनात आल्यावाचून रहात नाही
अथांग जनसागरात या
ओंडकाही आपला होतो
भवसागर तरुन जाताना
परकाही आपला होऊन जातो
सरते शेवटी बाकीला
कर्म आपले कामी येते
परोपकाराचीच शिदोरी
सदैव उपयोगी पडते
पंचत्वाची काया आपली
पंचत्वातच विलीन होते
चार खांदेकरी एक मडकेधाऱ्याची
बेजमी ही नियती करते
आपले परके भेद अमंगळ
हे मृत्यू नंतर कळते
सारे आपले म्हंटल्यावरच
या धरणीवर खरे सुखी जीवन सरते
धन नाशाचा गवगवा मनीचा
जनात सांगणे टाळावे
पत्नी वर्तन अमंगल ते
नजरेत आणणे सोडावे
टोमणे परिस्थितीचे सारे
पोटात लीलया रिचवावे
जाड कातडी जनलज्जेस्तव
जखमा झाकण्या ओढावे
जागे पणीच जागे होऊन
अमंगळ सारे दूर सारावे
मंगलमय जीवन आपले
आनंदातच आनंदाने कंठावे
हे सांगावे ते सांगू नये
हे आता खरेच टाळावे
मुक्त होउनी स्वच्छंदी
जीवन सुखाचे खरे जगावे....
