काय फायदा,काय आहे हशील
काय फायदा,काय आहे हशील
काय फायदा, काय आहे हशील
नांदत , होते जीवन तेथे,
काही, दिवसापुर्वी तिथे !
अस्तावस्त पडलेल्या वस्तु,
सफाई सुध्दा, होत नाही तिथे !! 1
निर्जन वास्तु, रिकाम्या खाटा,
माणुसकीला, पारखे झालेले लोक!
वास्तु , करूण स्वरात पुकारते,
द्या हो मज, जीवनाची भीक ! !2
अजून ही आम्ही, थांबवु शकत नाही,
पर्यावरणाने, झालेला ऱ्हास !
सृष्टीच , मृतप्राय, झाली तर,
कोण करील, वसुंधरेवर निवास !! 3
जंगलात होत असलेला वृक्षांचा ऱ्हास,
बंदिस्त, विचारात, जगत असलेले जग!
प्रदुषणाने,वाढत असलेले तपमान,
कुठवर हे विश्व , धरून राहिल तग !! 4
खुल्या हवेत, आम्ही आज ही,
श्वासोश्वास, करू शकत नाही!
मी, एकटा काय करू शकत़ो,
नकरात्मक, सुचतच नाही काही ! !5
वनस्पती,प्राणी, अन मानव,
एका कडीत बांधली, सजीव सृष्टी !
एक कडी , जरी तुटली तरी, सर्वनाश,अटळ,कुणांजवळ ही दृष्टी !! 6
भोग विलासाची, अर्थव्यवस्था,
वसुंधरेसाठी, वेळ आहे कुणाला!
जो तो आहे, आपल्याच स्वार्थात,
तरी ही शरम नाही मनाला !! 7
अजून ही वेळ गेलेली नाही,
ईमानदारीने प्रयत्नांची, शर्थ करा!
नाहीतर, ब्रम्हांडातील, असंख्य ग्रहांपरि,
सजीव हीन , होईल आपली धरा !! 8
निर्जीव वस्तु, जागच्या जागीच राहतील,
उपभोग, घेणाराच नष्ट होईल!
लक्षात असु द्या, असे वागण्यात,
काय फायदा, काय आहे हशील !! 9
