Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Rakesh More

Romance Tragedy Classics

3  

Rakesh More

Romance Tragedy Classics

काय झालं

काय झालं

1 min
188


काय झालं कशासाठी 

आज तू नाराज आहेस 

काल सर्व ठीक होतं 

अशी का तू आज आहेस || 0 ||


तूच माझी प्रेरणा 

तुझ्याविना मी रिता 

तूच माझं बायबल 

तू कुराण तू गीता 

तू माझ्या हृदयाच्या 

गाभाऱ्यातील आवाज आहेस 

काल सर्व ठीक होतं 

अशी का तू आज आहेस || 1 ||


तुझ्या माझ्या प्रेमाची 

शैली खूप मस्त आहे 

तुझ्या प्रेमात सदानकदा 

मी खुप व्यस्त आहे 

तू माझ्या प्रेमाचा 

अतिसुंदर बाज आहेस 

काल सर्व ठीक होतं 

अशी का तू आज आहेस || 2 ||


काय झालं माझ्याकडून 

काही चूक घडली का 

मला जशी जडली तशी 

प्रीत तूला जडली का 

तू माझ्या प्रेमाच्या 

शिखराचा ताज आहेस 

काल सर्व ठीक होतं 

अशी का तू आज आहेस || 3 ||



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance