प्रेमा तुझा रंग कसा....
प्रेमा तुझा रंग कसा....
प्रेमा तुझा रंग कसा...
सोबतीला माझ्या सखा जसा
प्रेमा तुझा रंग कसा
सुख दुःखात माझ्या उभा जसा
संसाराची ही नाव जशी
त्याला हरणांची जोडी जशी
प्रेमा तुझा रंग कसा
तुझ्या प्रेमाचा गुलाबी रंग जसा
सप्तपदी चालली अंगणात
तुझ्या सखा जिवलगा प्रेमात
तुझ्या माझा रंग कसा
तू बघशील सखा मला जसा
मखमली ची बाग जशी अंगणी
तुमच्याच रूपात लाभावा
मला हाच धनी
प्रेमा तुझा रंग कसा
माझा प्राणांपेक्षाप्रिय सखा जसा
प्रेमा तुझा रंग कसा
संसार दोघांचा डोक्यावर संसाराचा माठ
जन्म जन्माची देवा
असुदे आमची एकमेकांशीच गाठ
तुझ्या हाती माझा हात
संसाराला फुलवू तू ज्योती
मी वात ......
प्रेमात माझ्या आहे तुझी छाया
संसार तुझा माझा सुखी ठेव देवराया....

