विज्ञानाची जादू....🌏
विज्ञानाची जादू....🌏
दि.३ मार्च २०२२
विषय :- विज्ञानाची जादू*
१)
विज्ञानाची जादू
नेहमी अनुभवावी
जीवनाची प्रगती
जवळून पहावी
२)
विज्ञानासंगे सदैव
यशस्वी आपण व्हावे
अज्ञानाच्या अंधकाराला
मनातून दूर करावे
३)
डोळसपणे विज्ञानाकडे
जीवनात सदैव पहावे
अंधश्रध्देच्या झालरीला
स्वतःपासून दूर फेकावे
४)
विज्ञानातील गंमती
मुलांना सांगूया
त्यांच्या मनातील भिती
मिळूनी दूर करुया
५)
विज्ञान आहे खरे
लाभलेले वरदान छान
सर्वांनी मिळून राखू
विज्ञानाची शान
६)
वैज्ञानिक खेळ
सर्वजण खेळूया
ज्ञानाची ही साथ
नेहमीच धरुया
७)
अवती भोवतीने सदा
विज्ञानाची जादू पाहूया
गुणगान हे विज्ञानाचे
मुखातून गावूया
८)
विज्ञानाची जादू
असे अनोखी छान
जीवनी लाभलेले
विज्ञानाचे वरदान
९)
विज्ञानाच्या जादूसंगे
क्रांती नवी घडावी
समस्तजन सुखाने
इथे छान नांदावी
१०)
अंधश्रध्देचा अंधार
विज्ञानाने दूर होतो
ज्ञानाचा प्रकाश
जीवनी पसरतो
११)
विज्ञानाची ही जादू
मुलांसवे पहूया
नव नवे खेळ छान
आनंदाने खेळूया
१२)
विज्ञान दिन आज
आनंदाने करु साजरा
नविन प्रयोग शिकताना
चेहरा होईल हसरा
१३)
नविन प्रयोग करताना
उत्सुकता वाढते
निश्कर्षाकडे ओढ
सर्वांची लागते
१४)
विज्ञानाची जादू
प्रयोगशाळेत पाहूया
एकमेकांच्या मदतीने
प्रयोग नवे करुया
१५)
दैनंदिन जीवनात
जादू पाहू विज्ञानाची
प्रचिती येईल खरी
नाविन्याच्या आनंदाची
१६)
विज्ञानाची जादू
अनोखी असे छान
शाप नसून आहे
विज्ञान हे वरदान
१७)
ज्ञानासवे विज्ञानाची
सोबत छान जीवनी
आनंदाची हमे असे
नेहमीच माझ्या मनी
१८)
विज्ञानाची ही जादू
वेळोवेळी समजते
प्रत्यक्ष-अप्रत्यक्षाने
नवे ज्ञान मिळते
१९)
विज्ञानाची जादू
ज्ञान नवे देते
सुखकर जीवनाची
खात्री मज होते
२०)
विज्ञानासवे यश
जीवनी अनूभवते
उज्वल भविष्याची
स्वप्ने पुर्ण करते
