प्रेम रंग
प्रेम रंग
रंग प्रेमाचा तुझा माझा
हृदयाचा ठोका
चुकविलास माझ्या
नकळत प्रेमाचा
रंग लागला भरू .....
हृदयात प्रेमाची उधळन
झाली सुरू....
सहज सुचले शब्द
आणि तयार झाली कविता
मनातील स्पंदने मी
कागदावर लिहिता
या स्पंदनांनी शब्द रूप
घेऊन मुक्त केले मन
जगता - जगता
घुसमटलेले श्वास आणि
निशब्द मन
बहरून गेले बघता - बघता
अन काय झाले हे
काही मला उमजेना
चंद्र अंतरीत माझ्या
तरी चांदणे दिसेना
उमगले मी मला
वाटते जरी खरे
विचार संपले सारे
तरी ओढ काही सुटेना
कुठे सुरुवात झाली ही
मनाला माझ्या कळेना
फुलपाखराच्या रंगांची
आकाशात उधळन
बघून क्षितिजाची कला
झाली प्रेमाची पाखरंण
सायंकाळच्या उन्हात
केली ढगांनी अडचण
किरणांची रांगोळी
घालती सूर्यास्ताचे क्षण
मनात घेऊन ओढ
मी निघाले
जाता जाता कसे हे
अधीर मन झाले
जास्त काही मागत नाही
एक नजर हवी आहे
आतुरलेल्या मनाला ....
आयुष्यभरासाठी
साथ तुझी हवी आहे.....

