हसरी दिपावली
हसरी दिपावली
लखलख चंदेरी दारी
तोरण बांधले सोनेरी
खमंग फराळाचा
दरवळतोय सुहास
अंगणी रांगोळी पणत्यांची
सजली आरास
सुख,समृद्धी,समाधानाने
आली दिवाळी माया,ममता
प्रेम डोळ्यात साठवून
बहीण भावाला ओवाळी....
पाण्याविना शेती
शेती विना शेतकरी
नको फटाके नको
आतेषबाजी कधी
गरीबा घरी लावून
बघा आनंदाची हजेरी
प्रभू रामचंद्रांच्या
पदस्पर्शाने पावन
झालेली ही भूमी
एक दिवाळी करून
बघा अशी साजरी
नसेल कशाची कमी.....
श्रीमंतांची लकझक तर
गरीबाची काटकसरी
तर कोठे फक्त एक ज्योती
कुठे फटाक्यांचा कल्ला
तर कुठे गरिबांच्या आशा
कुठे चमचमीत गोड-धोड
तर कुठे तुकड्यांची अपेक्षा
नको लक्ष्मीमाता सोनं
फक्त दे गरीबास एक वेळेचं खाणं
नको राहावयाला आज
कुणीही उपाशी
प्रकाश कर देवा प्रत्येकाच्या दाराशी...
