असाच विचार.....
असाच विचार.....
एकदा असाच विचार करत होती...
नेमकी प्रेमाची भाषा तरी कोणती??
मराठी... इंग्रजी.. की हिंदी...
या विचारात डोक्याला लागली हवा थंडी....
तेव्हा मनाशीच विचार करून म्हटले...
असेल का प्रेमाची भाषा अशीच स्नेही स्पर्शी....
पुन्हा स्वतःलाच म्हटल नेमकी...
आहे तरी प्रेमाची भाषा कोणती...
चालत चालत थोडी पुढे गेली...
मधेच पायाला काटा टोचला...
काटा टोचता क्षणी पाणी आले डोळ्यातूनी....
डोळ्यातील पाणी बघुनी म्हटले...
कदाचित हीच प्रेमाची भाषा असेल का..
हृदय स्पर्शी नयनी....

