Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Padmakar Bhave

Romance

3.5  

Padmakar Bhave

Romance

प्रेम

प्रेम

1 min
223


आयुष्याला मारावी आता घट्ट मिठी 

जी नव्हती कधी पडली, 

ढाळावेत अश्रू आयुष्याच्या कुशीत बोलायचंय भरभरून मनमोकळं

माझ्याच आयुष्याशी मला,

साधलाच नाही संवाद,

किंवा हरवलाय संवाद,

किंवा हरवलंय आयुष्य.....


मारायची आहे मिठी खदखदून हास्याला,

नकोय आता चेहेऱ्यावरचं ठराविक

पाहुणं हास्य (?)

ओढून ताणून आणलेले बकवास

मॅनर्स फारकत द्यावी म्हणतो,

मारायची आहे घट्ट मिठी 


माझ्या आतल्या गुंडाळून ठेवलेल्या

जितेपणाला !

रिते व्हायचे आहे,स्वतःच स्वतःसोबत !

किती दिवसात रडलो नाही 

हमसाहमशी,ढसाढसा !

मारायची आहे मिठी रडण्यालाही !


बाहू पसरवून स्वतःलाच घ्यावे मिठीत !

आयुष्याच्या खांद्यावर डोकं ठेवून

पुटपुटावं काहीतरी!

अशी मिठी मारावी घट्ट अगदी

स्वतःच स्वतःला !



Rate this content
Log in