इशारा
इशारा
सखीला कळाला मनाचा इशारा
सुगंधी गुलाबी फुलाचा इशारा
किती बाग माझी फुलांनी फुलावी
धरेला कळाला मृगाचा इशारा
खरे आज झाले पहा स्वप्न माझे
परीला कळाला धुक्याचा इशारा
विजेने दिला पावसाला पुकारा
प्रियेला कळाला ढगाचा इशारा
पहा चंद्रमा पूनवेचा निघाला
रतीला कळाला नभाचा इशारा
मिठी मारुनी साजणीला मिळाला
पतंगास झाला दिव्याचा इशारा

