STORYMIRROR

Prashant Shinde

Action Classics

3  

Prashant Shinde

Action Classics

काय झालं..!

काय झालं..!

1 min
156

काय झालं म्हणून 

तीन मला विचार

काय सांगायचं 

हे नाही मला कळाल


आमचा काळ वेगळा

आमची रीत वेगळी

चार चौघांन पासून

सार झाकून असायचं


एखादं गुलाबाचं फुल

पाना आडच दिसायचं

त्याच्या साठी मग

जन्मभर मरायचं


सारं कस मोजून मापून

चार हाताच्या अंतरावर असायचं

सूत जमून येता येता

तारुण्य टांगतीला लागायचं


मग त्यातून काटे चुकवत

एखादं फुल हाती लागायचं

ते पदरात पडे पर्यंत झुरायच

मग सर्व साक्षीनं बाशिंग बांधायचं


हल्ली तस नाही होत

याच मोठं अप्रूप वाटत

आपल्याला हे मिळालं नाही

म्हणून आजही काळीज फाटत


काल बघ ना प्रेमाचं

चांगलं प्रदर्शन थाटात पार पडलं

आणि आज पुन्हा गुलाबाचं

चांगलंच गुलकंदात रूपांतर झालं


नवा डाव नवी विट्टी

ना नात्याची पट्टी 

ना मैत्रीची गट्टी

साऱ्यांचीच झाली सहज सुट्टी


वाईट वाटत ग अस पाहून

म्हणून मन मोकळं करतोय

यांना प्रेम कस काय कळत नाही

म्हणून प्रायश्चित घेतोय


बर झाल आपली सुटका

अग लवकर झाली

का कोण जाणे वाटते 

यांची रीत नसती कळली....!!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Action