काव्यगंध
काव्यगंध
विविध प्रश्न जेव्हा
मनात करतात घर
हळूच कागदावर उतरते मोत्यांची सर
मनातील भावतरंग लेखणीतून उतरतात
कागदावर उतरताच सुगंधाने दरवळून जातात
शब्दरूपी फुलात भरला जातो मनाचा गंध
लिहितांना मिळतो लेखणीला ही आनंद
नाही मी लेखक नाही मी कवी
प्रेरणा येथे मिळाली आस लागली नवी
"स्टोरी मिरर" मुळे मनाला लागला कवितेचा छंद
सापडायला लागले मी आता
कुठे तरी मला, जगते आहे स्वच्छंद
सुंदरी ही शब्दनगरी,
शब्दांचे सुखभारी
जोडले शब्द बनले सोबती,
अक्षरे जादुई मोहविती
वाटे कधीतरी कष्टाचे होईल
चांदणे यशाचा दिसेल चंद्र
*काव्यगंधाने*होई सुखाचा आभास
वाटेवरती पसरली जणू शुभ्र फुलांची आरास
वारा वाहे मंदधुंद
माडंते माझ्या सार्या व्यथा,व्यक्त होतांना
शब्दात हरवूनी जावे मिळतो असा एकांत
लेखणीतून साकारले जाते शब्दाचे अंतरंग
कल्पकता, शब्द रचना,
अंतरीचे भाव करे मज बेधुंद
दरवळत जाई जसा सर्वत्र फुलांचा सुगंध
