काव्य निरोप
काव्य निरोप
हल्ली पूर्वीसारखं लिहायला जमत नाही, वाटतं थांबवकी काय
बुद्धीला सुचत नाही हाताला जमत नाही, आणि थरथर कापतात पाय
आता लिहायला जड वाटतय, सारा मोकळेपणा हरवलाय
नुसतेच लेखनी फिरवतो, हात कुणी तरी आड्वलाय
वेळे सोबत आयुष्य सारतोय, खर्च होताना सारं पाहतोय
वाटतं सारखं धावतोय, पण आता सतत थकतोय
थांबवावं का तुला, आणी व्हावं विभक्त एकदाचं
संपवाव सारं काही, जे असेल ते सर्व कायमचं
हे ही फक्त विचारच म्हना, विचित्र का होईना लिहितोय
एकरस तूझसम असा होऊनी, वेगळं व्हायचं बघतोय
प्रवास अजून संपला नाही, पल्ला मोठा गाठायचाय
खुप आठवणींचा वर्णन सोहळा, शब्दात साठवायचाय
अजून ती वेळ आली नाही, वेगळं असं होण्याची
तुझीच साथ शेवट असेल, वेळ येईल जेव्हा निरोप घेण्याची
