काठी बनून चालू
काठी बनून चालू
कुणीतरी आपले हे
आयुष्यात देण्या साथ
आनंदात यशाच्या ह्या
सोबतीने देण्या हात
आठवण तुझी येता
घेतो पत्र हे लीहिण्या
नाही शब्द हे सुचत
अश्रू माझे हे टिपण्या
मनात माझ्या साचल
सारं बोलता येईल?
आयुष्याचे पुस्तक हे
संगतीने हे वाचील
ऊन, वारा, पावसात
भिजवून संगतीने
निजणार ह्या कुशीत
तुझ्या प्रेमाच्या स्पर्शाने
वार्धक्यात सोबतीने
काठी बनुनच चालू
मेल्यावर प्रेताचे हे
ओझे घेऊनच जाऊ
