कातरवेळ
कातरवेळ


पाऊस पडतो कातरवेळी
आठवण तुझी येते
तू आहेस इथेच
जाणीव मज ती होते
प्रेम तुझे नी माझे
असेच काही होते
असता तू येथे
तर काय झाले असते
सोबतीने जगता जगता
मी स्वतःला विसरले असते
प्रेम तुझे नी माझे
असेच काही होते
पाहुनी मला तू
किती गोड हसला होता
करताच मी काही खोडी
नाक मुरडून बसला होता
प्रेम तुझे नी तुझे
असेच काही होते
काढताना समजूत तुझी
मला किती कष्ट झाले
पाणी डोळ्यातले मग
अलगद तू ही पुसले
प्रेम तुझे नी माझे
असेच काही होते
पण रंगवलेली स्वप्ने
ती तशीच विरूनी गेली
दोघांना आस लावून
मन अडकुनी राहिली
प्रेम तुझे नी माझे
असेच काही होते
असेच काही होते......