STORYMIRROR

Pandit Warade

Inspirational

5.0  

Pandit Warade

Inspirational

काश्मिरी सफरचंद

काश्मिरी सफरचंद

2 mins
3.3K


पाठीवर तुझ्या रुळे वेणी नागफणी

गालावर सखे तुझ्या खळी जीवघेणी


नाकी नथ दिसे जणू चिंचेचा आकडा

भाळे तुझ्या रूपावर गडी हा रांगडा


तालासुरामध्ये पायी पैंजण वाजतसे

ठेक्यानिशी काळजाचा ठोका चुकतसे

 

लाजळूच्या झाडावाणी सुकुमार काया

आतुर तिला होती सारे हात लावावया


डाळिंबाच्या फोडीवाणी ओठ लाली लाल

काश्मिरी सफरचंद सखे तुझे गाल


तुझ्या रूपानं घातली जीवाला मोहिनी

तुझी मूर्ती डोळ्यापुढं दिसे रात्रंदिनी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational