कारण उरले नव्हते
कारण उरले नव्हते
खूप काही बोलायचे होते.
पण कारणच उरले नव्हते.
उरले नाहीत काही धागेदोरे,
बंध नात्यांचे कधीच तुटले होते.
कायमच समांतर होत्या आपल्या वाटा,
दूरदूर पावलांचे ठसे ही नव्हते.
उगाच मन का तुझ्या आठवात भिजते.
नकोच ते गुंतने आणि तूटने,
वेड्या मनाला का प्रेम तुझे भुलवते.
सगळच तर होते खोटे,सत्याचा नुसता भास होता.
श्वासात श्वास एक कधी झाले नव्हते.
कोणते नाव देवूया आपल्या नात्याला,
जिथे भावनांचे काहीच सोहळे नव्हते.
ख़ुप सारे माझे प्रश्न होते,
ज्याचे उत्तर कधीच तुझ्याकड़े नव्हते.
दूर जाण्याचे ते सारे बहाणे होते.
