कांही सांगायचं होतं गं.....!
कांही सांगायचं होतं गं.....!


काही सांगायचं होतं गं
तुला भेटलो की बोलेल गं
कित्ती दिवस झाले तुझा चेहरा नाही पाहिला गं
तू कधी येशील माझ्या मनाला आस लागून राहिली गं...
मला तुझा आवाज ऐकायचा होता गं
माझे कान आसुसलेले आहेत गं
मला तुझ्या नजरेत नजर मिळवायची आहे गं
माझे डोळे तुझी वाट पाहात आहे गं
मला तुझ्याशिवाय दिवस जात नाही गं
दिवस रात्र तुझ्या आठवणीत जागा असतोय गं
काल माझा वाढदिवस होता गं
तुला हेच सांगायचं होतं गं
मी खरंच विसरभोळा आहे गं
तुला मला हेच बोलायचं होतं का गं
अगं तसं काहीच नाही गं
तू कित्ती सुंदर दिसते गं
अरे तुझी मैत्रीण माझ्याशी गप्पा करतेय गं
तिच्या भावाचं लग्न माझ्याशी ठरलंय गं
वाढदिवसाला आमचं सगळं झालंय गं
तुला सांगेन म्हणून आता लक्षात आलंय गं...