STORYMIRROR

somadatta kulkarni

Inspirational

3  

somadatta kulkarni

Inspirational

कान्हा

कान्हा

1 min
293

कान्हा तुझी बासरी

मना मनास मोहवी

रूप सावळे गोविंदा

हृदयात मी साठवी  १


यशोदेचा नटखट

वसुदेव सुत हाच

कृष्ण देवकीनंदन 

शोभे त्रिखंडात तोच २


द्रौपदीचा सखा शोभे

सांदीपनी शिष्य खरा

अर्जुनाचा प्राणसखा

कृष्ण कृष्ण गाजे नारा ३


वृंदावनी रास रंगे

गोपी धुंद कृष्णा संगे

सुदाम्याचा जिवलग

हृदयात माझ्या नांदे  ४


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational