कांचन सोनेरी बहावा
कांचन सोनेरी बहावा
तो कांचन सोनेरी बहावा
फुलला मोठ्या डौलाने
रक्तवर्णी तो गुलमोहर
पाहतो त्याकडे प्रेमाने
जाहला सुरू वसंतऋतू
शिव गौरीचा प्रणय बहरा आला
वसंताने केले मग पाचारण
मदनाला
शिवाचा रूदयी शिरण्याला
सोनेरी पिवळा बहावा म्हणजे
अंतर्बाह्य फुललेली सती
गुलमोहर म्हणजे तो
रागीट शिव तिचा पती
मदन शिव हृदयात शिरला
जागविली कामभावना
क्रोध आला शिवाला
जाळुनी अनंग केले मदना
मदनाने आपले काम साधले
शिव गौरीच्या ऐक्य झाले
तारकासुराला मारण्यासाठी
कार्तिकस्वामी जन्मा आले

