कामा पुरते....
कामा पुरते....
माझ्याविना कुणाचे सरते
सारेचं भेटतात कामा पुरते....
माझ्या सुखात ते सहभागी
दुःख येता ते दुर दुर भागी
माझी आशा आशेतं झुरते....
काम होता का दुर पळती
गोड बोलून मला का छळती
मन शब्दांच्या जाळ्यात हरते....
मिळता यश करे नमस्कार
माझा हात धरे का तिरस्कार
लबाड ही जिद्द कुठे पाणी भरते....
जगा हो तुम्ही तुमच्या नशेत
संगम ठीक आहे त्याच्या दशेत
माझी नात्यांची आस कुठे मरते....
