काळोखी जीवनी
काळोखी जीवनी
एक एक राती जागूनी सोबती केली
चंद्र नभीचा असूनी काळोखी जीवनी
स्वत:स जागली ती पहाट हरली
मनास वाहीली ती काहीली सलली
विरताना उन्हात सावली ताप देवुनी गेली
जगताना स्वाभिमान ही दुखावुनी जगली
मान डोलावुनी झेलली यादी होती अपमानी
सुखाच्या कल्पनानी झळा दु:खाच्या मनी
स्वतःला समजुनी चाले वाट येई अंधारुनी
स्वाभिमान दूर सारुनी काय उरे श्वासातुनी
