काळोख
काळोख
रंग अंधारास आता मागतो तू आहे
त्यातल्या रंगात खोटे नाहतो तू आहे
त्यात भारांचेच ओझे काय घ्यावे सारे ?
उंच एकांतात मारे राहतो तू आहे
हाय! श्रुंगारास साऱ्या चांदण्या त्या खोट्या?
मंद वाऱ्यांचेच दुःखे वाहतो तू आहे
आज आनंदात माझ्या हारलेल्या बाज्या
काय संसारात बाजी शोधतो तू आहे
सांग अंधारास काळे आरशाने केले
त्याच अंधारात राजा नांदतो तू आहे
