STORYMIRROR

Meenakshi Kilawat

Tragedy

3  

Meenakshi Kilawat

Tragedy

काळीज फाटले

काळीज फाटले

1 min
297

काळीज फाटले माझे अन्

मालाच माहित नाही

पण कुठे गेली माणुसकी

जरा डोळ्यात ओल नाही.।।


सांभाळतो स्वतःला या

घान दलदलात पंकज

या सागरात कधी ही

सजलेच कमल नाही ।।


आले तसेच गेले

वास्ता दिसे न कोणा

पाझर फुटेल ऐसा

कोणताच बोल नाही।।


निभावूनी चालणारा

या श्वासात भास नाही

आला कधी बहर तो

नविन साल नाही।।


काबाड कष्ट करतो

त्याच्या हिश्यात ग्लानी

हा एकही सुखाचा

नशिबात कौल नाही।।


अंदाज माणसाचा

आला कधीच नव्हता

वाटेत भेटणारे

सर्वेच अनमोल नाही.।।


प्राणीमात्र तडफडतो हा

पाण्याविणा जलाला

अवनीत या जलाचा

साठाच खोल नाही.।।


साधावयास मतलब

जगतो जगात कोणी

त्याला जगात कोठे

कसलेच नवल नाही.।।


साऱ्याच जीवनाचा

आधार कोण आहे

देवात मानवाच्या

भक्तीत डौल नाही.।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy